एमआयडीसी इंडिया मध्ये नोकरी.midc india nokari.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन) midcindia मध्ये नोकर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या midcindia आस्थापनेवरील गट 'अ', 'ब' आणि 'क' संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) ही पदे - सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २ सप्टेंबर, २०२३ पासून ते दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल. वरील पदांकरीता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.मकसी१००७/प्र.क्र.३६/ का३६, दिनांक १० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करु शकतील. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.
● सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता महामंडळाच्या www.midchdia.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी www.midcindia.org या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन (Online) पध्दतीनेच www.midcindia.org या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. सदर संकेतस्थळास भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरतीप्रक्रिये संबंधित आवश्यक ती अद्ययावत माहिती प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
भरतीप्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे महामंडळाच्या
www.midcindia.org या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी
कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर वेळावेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या
सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक
ईमेल: gmhrrecruitment@midcindia.org
वेबसाइट: www.midcindia.org
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (midc)आस्थापनेवरील गट 'अ', 'ब' आणि 'क' च्या एकूण ३४ संवर्गातील ८०२ पदांसाठी सरळसेवेने भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक उमेदवारांनी दिनांक २ सप्टेंबर २०२३ ते दिनांक २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत www.midcindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन
पद्धतीने अर्ज सादर करावेत. संभाव्य रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव आणि वेतनश्रेणी खलील प्रमाणे आहे.
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
जागा-२३ वेतन ६७७००-२०८७००
उपअभियंता (स्थापत्य)
जागा-२० वेतन ५६१००-१७७५००
उप अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)
जागा-20 वेतन 56100-177500
सहयोगी निर्माता
जागा-२३ वेतन ६७७००-२०८७००
उपसंगीतकार
जागा-२० पगार ५६१००-१७७५००
उपमुख्य लेखाधिकारी
जागा-२० पगार ५६१००-१७७५००
सहायक अभियंता (स्थापत्य)
जागा-१५ पगार ४१८००-१३२३००
सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)
जागा-१५ पगार ४१८००-१३२३००
सहाय्यक वास्तुविशारद
सहाय्यक निर्माता
जागा-१५ पगार ४१८००-१३२३००
जागा-१५ पगार ४१८००-१३२३००
लेखा अधिकारी
जागा-१५ पगार ४१८००-१३२३००
क्षेत्र प्रशासक
जागा पगार ४१८००-१३२३००
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
जागा-१४ पगार ३८६००- १२२८००
कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी)
जागा-१४ पगार ३८६००१२२८००
लघुलेखक (उच्च श्रेणी)
जागा-१५ पगार ४१८००-१३२३००
लघुलेखक (निम्न श्रेणी)
जागा-१४ पगार ३८६००१२२८००
स्टेनोग्राफर
जागा-६ पगार १९९००-६३२००
सहाय्यक
जागा- पगार ३५४००-११२४००
लिपिक टंकलेखक
जागा-६ पगार १९९००-६३२००
वरिष्ठ लेखापाल
जागा-१४ पगार ३८६००१२२८००
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)
जागा-८ पगार २५५००-८११००
विजतंत्री (श्रेणी-२)
जागा-८ पगार २५५००-८११००
पंप चालक (वर्ग-2)
जागा-६ पगार १९९००-६३२००
जोडारी (श्रेणी-2)
जागा-६ पगार १९९००-६३२००
सहाय्यक ड्राफ्ट्समन
जागा-८ पागार २५५००-८११००
ट्रेसर
जागा-७ पागार २१७००-६९१००
गाळणी निरीक्षक २८
जागा-१० पागार ९२०० ९२३००
जमीन सर्वेक्षक
जागा-८ पगार २५५००-८११००
विभागीय अग्निशमन अधिकारी
जागा-२० पागार ५६१००-१७७५००
सहायक अग्निशमन अधिकारी
जागा-१४ पगार ३८६००१२२८००
कनिष्ठ संपर्क अधिकारी
जागा-१३ पागार ३५४००-११२४००
वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल )
जागा-८ पागार २५५००-८११०० -
चालक उपकरणे चालक
जागा-७ पागार २१७००-६९१००
अग्निशामक यंत्र
S-६: १९९००-६३२००
एमआयडीसी इंडिया नोकरी भरती प्रक्रिया पुर्ण pdf डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
👉👉 Midcindia india 👈👈
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेळापत्रक
तपशील
दिनांक ०२.०९.२०२३
१ ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक
२ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २५.०९.२०२३ हा आहे.
३ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक २५.०९.२०२३
परीक्षेच्या आधी ७ दिवस
परिक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र, प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी www.midcindia.org या
संकेतस्थळास भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
⏩महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ⏩
वरील माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा