या विद्यार्थ्यांना मिळणारं 500 रुपये महिना. Ya vidhyarthyana 500 rupye milnar.
![]() |
Ya vidhyartyana milnar 500rs |
मी मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हि घोषणा केली. या निर्णयामुळे आयटीआय चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार आहे.
आता आयटीआय मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये सरकार देणार.
राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना आणली आहे. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे आणि 288 विधानसभा मतदार संघा मध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन करून या राज्यस्तरीय उपक्रमाची सुरुवात मंत्री लोढा यांच्या हस्ते झाली.
या योजनेच्या शुभारंभ राजश्री छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबिरांचे आयोजन केले आहे.
विद्यार्थ्यांना मदतीसाठी ई-मेल आयडी आणि हेल्पलाइन पण सुरू करण्यात येणार आहे.
आधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा.
आपल्या देशात मागील काही वर्षात औद्योगिक, कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. त्या बदला मुळे विविध कौशल्ये असलेले रोजगार या क्षेत्रामध्ये भरपुर प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. पण या कौशल्याचे प्रशिक्षण कोठे घ्यायचे, त्यासाठीच्या प्रशिक्षण संस्था कुठे आहेत, प्रवेशप्रक्रिया कशी असते याची माहिती ज्ञान अनेक विद्यार्थांना नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पारंपरिक शिक्षण घेताना दिसतात. या विद्यार्थ्यांसाठी भविष्याची विविध नवीन संधी खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम, कला त्यांना माहीत व्हावेत यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात 6 मे ते 6 जून 2023 पर्यंत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
वरील लेख आवडला असेल तर नक्की लाईक शेयर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा